Join us

शक्य असेल तर आज टाळा लोकल प्रवास! सीएसएमटी-दादरदरम्यानच्या ब्लॉकमुळे होऊ शकतो खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 1:31 AM

रेल्वे रुळासह सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेवर आज ४ जानेवारी रोजी अंधेरी ते गोरेगावच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप जलद आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात येईल.

मुंबई : रेल्वे रुळासह सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेवर आज ४ जानेवारी रोजी अंधेरी ते गोरेगावच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप जलद आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात येईल.मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर दरम्यान, अप जलद मार्गावर सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाईल, तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर डाउन जलद, अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ९.३० ते ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून, या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर दरम्यानची वाहतूक बंद असेल. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर या रविवारी कोणत्याही प्रकारचा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, लष्करामार्फत उभारण्यात येणाºया ३ पुलांपैकी शेवटचा पूल करी रोड स्थानकात रविवारी उभारण्यात येणार असून, पुलासाठी मध्य रेल्वेनेदेखील विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला आहे. परिणामी, सकाळी ८ वाजून ३० मिनिटांपासून ६ ते ८ तासांपर्यंतचा ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. या काळात दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद असणार आहे.करी रोड पुलासाठीही विशेष ब्लॉकलष्करामार्फत आंबिवली, एल्फिन्स्टन-परळ येथे पादचारी पूल उभारण्यात आला. आंबविली पुलाचे काम पूर्ण झाले असून, एल्फिन्स्टन-परळ पुलाची उभारणी झाली आहे.करी रोड येथील पुलासाठी रविवारी सकाळी ८ वाजून ३० मिनिटे ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत (८ तास) अप जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे.सकाळी ९ वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत (६ तास) डाउन आणि अप जलद मार्गांसह, डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक असेल.ब्लॉक काळात सीएसएमटी-दादर धिम्या आणि जलद मार्गावरील दोन्ही दिशेकडील लोकल फेºया रद्द करण्यात येणार आहेत.ब्लॉकमुळे रविवारी धावणाºया सिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि सह्याद्री एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.गाड्यांचे वेळापत्रक -ब्लॉक आधी...शेवटची लोकल अप फास्ट मार्गावर दादरहून सकाळी ८.१२ वाजता सुटेल.शेवटची लोकल अप स्लो मार्गावर दादरहून सकाळी ९.०० वाजता सुटेल.शेवटची लोकल डाउन स्लो मार्गावर सीएसएमटीहून सकाळी ९.०५ वा. सुटेल.शेवटची लोकल डाउन फास्ट मार्गावर सीएसएमटीहून सकाळी ९.१२ वा. सुटेल.ब्लॉकनंतर...पहिली लोकल अप स्लो मार्गावर दादरहून दुपारी ३.३५ वाजता सुटेल.पहिली लोकल अप फास्ट मार्गावर दादरहून दुपारी ४.३८ वाजता सुटेल.पहिली लोकल डाउन फास्ट मार्गावर सीएसएमटीहून दुपारी ३.४० वा. सुटेल.पहिली लोकल डाउन स्लो मार्गावर सीएसएमटीहून दुपारी ३.५० वाजता सुटेल.

टॅग्स :मुंबई लोकल