ठाकुर्लीत आज ‘ब्लॉक’
By admin | Published: April 9, 2017 02:22 AM2017-04-09T02:22:31+5:302017-04-09T02:22:31+5:30
ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील होम फलाट सुरू करण्यासाठी रुळांची जोडणी आणि अन्य तांत्रिक कामांसाठी रविवारी ठाकुर्ली येथे अप धीम्या मार्गावर सकाळी ९.०५ ते सायंकाळी ५.२० वाजेपर्यंत
डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील होम फलाट सुरू करण्यासाठी रुळांची जोडणी आणि अन्य तांत्रिक कामांसाठी रविवारी ठाकुर्ली येथे अप धीम्या मार्गावर सकाळी ९.०५ ते सायंकाळी ५.२० वाजेपर्यंत आठ तासांचा ट्रॅफिक आणि पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, ब्लॉकच्या काळातील कल्याण धीम्या लोकल रद्द करण्यात येतील. जलद मार्गावरील लोकल नियोजित वेळापत्रकाच्या २० मिनिटे विलंबाने धावतील.
ट्रॅफिक व पॉवरब्लॉकमुळे डाउन मार्गावरील सर्व लोकल सकाळी १०.०८ ते सायंकाळी ५.२८ वाजेपर्यंत मुंब्रा स्थानकानंतर डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. फलाटांअभावी त्या कोपर-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांत थांबणार नाहीत. सीएसटी-डोंबिवली लोकल धीम्या मार्गावरून वेळापत्रकानुसार धावतील. तसेच कल्याण स्थानकासाठीच्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. त्या वेळेत डोंबिवलीसाठी सीएसटी स्थानकातून विशेष लोकल सोडण्यात येतील. डाउन मार्गावरील जलदच्या लोकल कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे, दिवा स्थानकात थांबतील. कल्याणहून सीएसटीला धावणाऱ्या जलद व अर्धजलद लोकल वेळापत्रकाच्या २० मिनिटे विलंबाने धावतील. तसेच डाउनच्या लोकल सीएसटी ते विविध स्थानकांदरम्यान वेळापत्रकाच्या १५ मिनिटे विलंबाने धावतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही
बसणार फटका
ठाकुर्ली स्थानकात डाउनच्या दिशेवर ब्लॉकच्या कालावधीत लोकल उपलब्ध नसतील. त्यामुळे येथील प्रवाशांनी डोंबिवली अथवा कल्याण स्थानकातून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच सकाळी ९ ते ९.५० या वेळेत अप मार्गावर लोकल धावणार नाही. (प्रतिनिधी)
- सीएसटी, दादर व लोकमान्य टिळक टर्मिनसला येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या इगतपुरी व लोणावळा स्थानकांतून वेळापत्रकाच्या अर्धा तास विलंबाने धावतील, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.