Join us

ग्राहकांना वेठीला धरत आज तीन तास केबल बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 7:04 AM

केबलचालकांनी ब्लॅकआऊटचा इशारा दिल्याने त्याविरोधात इशारा देणारी ट्रायची यंत्रणाच ब्रॉडकास्टर्सच्या पायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत केबलचालकांनी प्राइम टाइममध्ये गुरूवारी तीन तास केबल बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेतला.

मुंबई : केबलचालकांनी ब्लॅकआऊटचा इशारा दिल्याने त्याविरोधात इशारा देणारी ट्रायची यंत्रणाच ब्रॉडकास्टर्सच्या पायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत केबलचालकांनी प्राइम टाइममध्ये गुरूवारी तीन तास केबल बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेतला. ट्रायच्या निर्णयांना आणि काही वाहिन्यांना विरोध करताना त्यांनी पुन्हा ग्राहकांचीच कोंडी करत त्यांना वेठीला धरण्याचा पवित्रा उचलला आहे.ट्रायचे नियम ग्राहकांसह केबल व्यावसायिकांसाठी जाचक आहेत. त्याचा लाभ केवळ ब्रॉडकास्टर्सना होईल. ग्राहकांना दरवाढीला सामोरे जावे लागेल, असा आरोप बुधवारच्या बैठकीत केबल आॅपरेटर अ‍ॅण्ड ब्रॉडकास्टर असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. अनील परब यांनी केला आणि ट्रायच्या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी सायंकाळी ७ ते १० पर्यंत प्रसारण बंद ठेवून ब्लॅक आऊट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. २००८ मध्ये अवघ्या अडीच हजार कोटींची असलेली टीव्ही मनोरंजन क्षेत्राची उलाढाल आता १२ हजार कोटींवर गेली आहे. ब्रॉडकास्टर्सना जाहिरातीच्या माध्यमातून ६५ हजार कोटींचे उत्पन्न मिळते. पण ट्राय केवळ केबल व्यावसायिकांच्यात्यांनी केला. या बैठकीला राज्यभरातून मोठ्या संख्येने केबल व्यावसायिक उपस्थित होते. ट्रायने हा निर्णय बदलावा व एकूण उत्पन्नापैकी ४० टक्के हिस्सा केबल व्यावसायिकांना द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.वरळीत आज मोर्चाट्रायच्या निर्णयाचा लाभ केवळ ब्रॉडकास्टर्सना मिळणार असून या निर्णयामुळे विदेशी वाहिन्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन केबल व्यावसायिक देशोधडीला लागण्याची भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली. या निर्णयामागे स्टार कंपनीचा हात असल्याचा संशय व्यक्त करत शुक्रवारी दुपारी स्टारविरोधात वरळीच्या जांबोरी मैदान येथून लोअर परळ येथील स्टारच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे परब यांनी सांगितले. स्टारच्या वाहिन्यांवर बहिष्कार घालण्यात येणार असून इतर वाहिन्यांनी यापासून धडा न घेतल्यास त्याही दाखवायच्या की नाही, याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.केबल व्यावसायिकांच्या मागण्यामल्टिसर्व्हिसेस प्रोव्हाडयर (एमएसओ)ना प्लेसमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न व ब्रॉडकास्टर्सना जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकूण रक्कमेपैकी तब्बल ८० टक्के महसूल ब्रॉडकास्टर्सना, तर उर्वरित २० टक्क्यांमध्ये केबल व्यावसायिक व एमएसओना प्रत्येकी १० टक्के देण्याचा निर्णय ट्रायने घेतला आहे. यामुळे केबल व्यवसाय संपुष्टात येईल, अशी भीती परब यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :टेलिव्हिजन