Join us

आज मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक; कुर्ला-वाशी लोकलसेवा पूर्णपणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 5:39 AM

सिग्नल यंत्रणेच्या कामांसाठी रविवार, १५ एप्रिल रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

मुंबई : सिग्नल यंत्रणेच्या कामांसाठी रविवार, १५ एप्रिल रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल, तसेच हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान, कुर्ला-वाशी लोकलसेवा पूर्णपणे बंद राहील.मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १०.४८ ते दुपारी ४.१४ वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या सर्व धिम्या, अर्धजलद लोकल फेºया, कल्याण ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येतील. ब्लॉक काळात ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकांवरील प्रवाशांसाठी लोकल नसतील. या स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकावरून प्रवास करण्याची मुभा आहे. सकाळी १०.०५ ते दुपारी २.५४ दरम्यान सीएसएमटीहून सुटणाºया सर्व डाउन जलद मार्गावरील लोकलसेवा नेहमीच्या थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील.हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाºया लोकल आणि सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीला जाणाºया लोकल बंद असतील. तर, सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.- पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्याने, रविवारी दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :मुंबई लोकल