Join us

आज मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक; पॅसेंजर गाड्यांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:52 AM

अभियांत्रिकी कामे पूर्ण करण्यासाठी १ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५६ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच हार्बर रेल्वेमार्गावर कुुर्ला-वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : अभियांत्रिकी कामे पूर्ण करण्यासाठी १ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५६ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच हार्बर रेल्वेमार्गावर कुुर्ला-वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.मध्य रेल्वेमार्गावर सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५६ दरम्यान कल्याणहून सुटणाऱ्या सर्व अप जलद लोकल दिवा ते परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील. दरम्यान, या गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील. सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाºया सर्व डाऊन जलद लोकल निर्धारित थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि विक्रोळी स्थानकांवर थांबतील. दरम्यान, सर्व गाड्या अंतिम स्थानकांवर २० मिनिटे उशिराने पोहोचतील.हार्बर रेल्वेमार्गावर सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/ बेलापूर/ पनवेलला जाणाºया सर्व लोकल बंद राहतील. सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ दरम्यान वाशी/ बेलापूर/ पनवेलहून सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ वडाळा रोडला जणाºया सर्व लोकल बंद राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील.

पॅसेंजर गाड्यांनाही फटकाब्लॉक काळात दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणाºया सर्व मेल/ एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. त्यामुळे या गाड्या २० मिनिटे उशिराने पोहोचतील. तसेच गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही दिवा स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल. ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दादरऐवजी दिवा स्थानकाहून सुटेल. ५०१०३च्या प्रवाशांकरिता ३.४० वाजता दादर स्थानकाहून विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे. ही गाडी ४.०६ वाजता ठाणे स्थानकावर पोहोचेल.

टॅग्स :मुंबई लोकल