आज सीएसटी-पनवेल शेवटची लोकल रद्द

By admin | Published: March 12, 2016 04:06 AM2016-03-12T04:06:36+5:302016-03-12T04:06:36+5:30

मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर डीसी ते एसी परावर्तनाची चाचणी १२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

Today CST-Panvel canceled the last local | आज सीएसटी-पनवेल शेवटची लोकल रद्द

आज सीएसटी-पनवेल शेवटची लोकल रद्द

Next

मुंबई : मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर डीसी ते एसी परावर्तनाची चाचणी १२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या चाचणीसाठी पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री सीएसटीहून पनवेलसाठी सुटणारी शेवटची लोकल रद्द करण्यात आली आहे. शनिवारी पनवेलसाठी शेवटची लोकल १०.१८ वाजता, वाशीसाठी १०.३७ वाजता तर अंधेरीसाठी शेवटची लोकल ११.0७ वाजता धावेल. हार्बरबरोबरच ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बरच्या सेवेतही बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर
१२ डबा लोकलचे काम पूर्ण केले जात आहे. हे काम पूर्ण करतानाच मार्च अखेरपर्यंत डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 व्होल्ट डायरेक्ट करंट) परावर्तन पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे लोकलचा वेग वाढण्याबरोबरच वीजबचतही होईल, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. तत्पूर्वी या परावर्तनाची चाचणी १२ मार्चच्या मध्यरात्री सहा तासांत करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. सीएसटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावर, रावळी जंक्शन ते माहीम अप आणि डाऊन मार्गावर तसेच ठाणे ते वाशी अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्ग, कारशेड, सायडिंग आणि यार्डमध्ये परावर्तनाची चाचणी होईल. या कामामुळे शनिवारी रात्री सीएसटीहून सुटणाऱ्या शेवटच्या तसेच रविवारी सकाळी पहिल्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. हार्बरवर १२ मार्च रोजी ५९0 लोकल फेऱ्यांपैकी ५६२ लोकल धावतील; तर १३ मार्च रोजी ४९२ फेऱ्यांपैकी ४१0 फेऱ्या होतील. त्याचप्रमाणे ठाणे-वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बरवर १२ मार्च रोजी २३२ लोकल फेऱ्यांपैकी २१९ फेऱ्या आणि १३ मार्च रोजी २१0 फेऱ्यांपैकी १९0 फेऱ्या होतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे हार्बर मार्गावर रविवारी कोणताही मेगाब्लॉक होणार नाही. (प्रतिनिधी)
>> वेळापत्रकातील महत्त्वाचे बदल
१२ मार्च रोजी हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील शेवटच्या लोकलमधील बदल पुढीलप्रमाणे
१३ मार्च रोजी हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील पहिल्या लोकल पुढीलप्रमाणे असतील.
सीएसटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल १०.१८ वा.
पनवेलहून सीएसटीसाठी शेवटची लोकल ९.५९ वा.
सीएसटीहून वाशीसाठी शेवटची लोकल १०.३७ वा.
सीएसटीहून अंधेरीसाठी शेवटची लोकल ११.0७ वा.
अंधेरीहून सीएसटीसाठी शेवटची लोकल १०.३७ वा.
ठाण्याहून पनवेलसाठी शेवटची लोकल १०.१५ वा.
ठाण्याहून वाशीसाठी शेवटची लोकल १०.४0 वा.
पनवेलहून ठाण्यासाठी शेवटची लोकल १०.११ वा.
वाशीहून ठाण्यासाठी शेवटची लोकल १०.00 वा.सीएसटीहून पनवेलसाठी पहिली लोकल ६.४४ वा.
पनवेलहून सीएसटीसाठी पहिली लोकल ६.३५ वा.
वाशीहून सीएसटीसाठी पहिली लोकल ६.३१ वा.
सीएसटीहून अंधेरीसाठी पहिली लोकल ६.४0 वा.
अंधेरीहून सीएसटीसाठी पहिली लोकल ६.१८ वा.
ठाण्याहून वाशीसाठी पहिली लोकल ६.३९ वा.
ठाण्याहून पनवेलसाठी पहिली लोकल ७.0६ वा.
वाशीहून ठाण्यासाठी पहिली लोकल ६.४८ वा.
पनवेलहून ठाण्यासाठी पहिली लोकल ६.३९ वा.

Web Title: Today CST-Panvel canceled the last local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.