मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ पुरस्कारांचे आज वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 02:36 AM2019-01-23T02:36:48+5:302019-01-23T02:36:50+5:30
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण बुधवारी, २३ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी २.३० वाजता होणार आहे.
मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण बुधवारी, २३ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी २.३० वाजता होणार आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे संस्थापक सदस्य व दिवंगत अध्यक्ष कृ. पां. सामक यांच्या नावाने दिला जाणारा पहिला आणि आजवरचा हा तिसरा पुरस्कार आहे.
दिनू रणदिवे यांच्याआधी विनायक बेटावदकर आणि विजय वैद्य या ज्येष्ठ पत्रकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रणदिवे यांचा जन्म डहाणूतील आदिवासीबहुल भागात १९२५ साली झाला. त्यांनी १९५६ साली पत्रकारितेला सुरुवात केली. दलित, उपेक्षित, शोषित, कामगारांचे प्रश्न मांडतानाच त्यांनी राजकीय पत्रकारितेतही आपला ठसा उमटविला. स्वातंत्र्य चळवळीपासून संयुक्त महाराष्ट्राच्या
लढ्यापर्यंत आणि गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
या पुरस्कार सोहळ्यात राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने वृत्तपत्र माध्यमातून विश्वास वाघमोडे व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून महेश तिवारी तसेच मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना देण्यात येणाºया उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने प्राजक्ता पोळ यांना सन्मानित केले जाईल. ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर
आणि ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असेल.