आज मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक, वांगणी स्थानकात अभियांत्रिकी काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:59 AM2018-02-17T01:59:14+5:302018-02-17T01:59:22+5:30
वांगणी स्थानकात होणाºया अभियांत्रिकी कामामुळे मध्य रेल्वेने शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारच्या मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांपासून ते पहाटे ६ वाजून १० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
मुंबई : वांगणी स्थानकात होणाºया अभियांत्रिकी कामामुळे मध्य रेल्वेने शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारच्या मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांपासून ते पहाटे ६ वाजून १० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या कालावधीत काही लोकल फेºया रद्द करण्यात येणार आहेत. रात्रकालीन ब्लॉकमुळे पहाटे अप आणि डाऊन लोकल फेºयांवर परिणाम होईल. यामुळे ठाणे स्थानकातून कर्जतला जाणारी पहाटे ५ वाजताची लोकल ५ वाजून २८ मिनिटांनी सुटणार आहे. ही लोकल कल्याण स्थानकापर्यंतच धावणार असून कल्याण-कर्जत मार्गादरम्यान ही लोकल रद्द राहणार आहे. कर्जत स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांची लोकल ६ वाजून ३३ मिनिटांनी कल्याण येथून सुटेल. याचबरोबर ट्रेन क्रमांक १२९४० जयपूर-पुणे एक्स्प्रेस लोणावळा येथे एक तास उशिराने अपेक्षित आहे.