मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत आता नियंत्रणात येत असल्याने महापालिकेच्या विविध समित्यांच्या बैठका व महासभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्यानुसार पाच महिन्यांनंतर महापालिकेची पहिली महासभा गुरुवारी होणार आहे. या बैठकीत सत्ताधारी शिवसेना आणि पालिका आयुक्तांना कोंडीत पकडण्याचे मनसुबे भाजपने आखले आहेत. त्यामुळे पहिल्याच बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिका अधिनियमानुसार किमान एक मासिक सभा घेणे बंधनकारक आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी एप्रिल महिन्यापासून महासभा रद्द करण्यात आली आहे.यामुळे महापालिकेचे विकास प्रकल्प, अर्थसंकल्प, विविध समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्ती तसेच वैधानिक, विशेष, प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. वैधानिक समित्यांवर १ एप्रिलला निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नेमणूक करणे हा विषय महासभेत मंजूर झाल्यानंतरच वैधानिक समित्या गठीत होऊन त्याचे कामकाज व सभा सुरू होऊ शकते.मात्र यापूर्वी आयोजित महासभा दोन-तीन वेळा रद्द केल्यामुळे विरोधी पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.अखेर गुरुवारी दुपारी दोन वाजता ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. यामध्ये पालिका मुख्यालयात आयुक्तांच्या सुरक्षेसाठी नेमलेले बाऊन्सर्स, बंगल्याच्या दुरुस्तीचा खर्च या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.>कोरोनामुळे रद्दमुंबई महापालिका अधिनियमानुसार किमान एक मासिक सभा घेणे बंधनकारक आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी एप्रिल महिन्यापासून महासभा रद्द करण्यात आली आहे. आजही सभा होणार आहे़
पाच महिन्यांनंतर आज पालिकेची पहिली सभा, शासनाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 2:13 AM