आज नौदलाच्या युद्धनौका पाहण्याची सर्वसामान्यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:37 AM2019-09-15T06:37:05+5:302019-09-15T06:37:14+5:30
नौदल सप्ताहानिमित्त नौदलातर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून नौदलाच्या ताफ्यातील युद्धनौका पाहण्याची संधी सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
मुंबई : नौदल सप्ताहानिमित्त नौदलातर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून नौदलाच्या ताफ्यातील युद्धनौका पाहण्याची संधी सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. रविवार १५ व २२ सप्टेंबर हे दोन दिवस सर्वसामान्य नागरिक या युद्धनौका पाहू शकतील, तर शालेय विद्यार्थ्यांना शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी प्रवेश देण्यात येईल.
‘तुमच्या नौदलाला जाणून घ्या’ या टॅगलाइनद्वारे हे अभियान राबविण्यात येईल. हे ३ दिवस सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत युद्धनौका पाहता येतील. बॅलार्ड इस्टेट येथील नेव्हल डॉकयार्डच्या टायगर गेटमधून यासाठी प्रवेश दिला जाईल, असे नौदलातर्फे सांगण्यात आले. यासाठी कोेणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रवेश करताना मोबाइल, कॅमेरा किंवा बॅग घेऊन आत जाता येणार नाही.