Join us  

२०१९ ला काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण मी आज सोडवला- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 9:48 PM

जे कोण आज बोलतायत त्यांनी २०१९ ला बाळासाहेबांचे विचार कोणाच्यातरी दावणीला बांधले. त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण मी आज सोडवला अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. 

“आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विचारांचा हा विचार आहे. जे कोण आज बोलतायत त्यांनी २०१९ ला बाळासाहेबांचे विचार कोणाच्यातरी दावणीला बांधले. त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं. त्यांना ही मोठी चपराक आहे. जेव्हा त्यांच्या बाजूनं निकाल लागतात तेव्हा न्यायव्यवस्था बरोबर असते. जेव्हा विरोधात निर्णय लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, न्यायव्यवस्था विकली गेली असं म्हटलं जातं. ही दुटप्पी भूमिका घेतायत त्यांना त्यांची जागा निकालानं दाखवून दिली. यापुढेही बाळासाहेबांची भूमिका विचार पुढे नेणार आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले. “त्यांनी यापूर्वीच घनुष्यबाण गोठवलं जाईल असं म्हटलं होतं. परंतु २०१९ ला काँग्रेस राष्ट्रवादीकडे जो धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो मी आता सोडवला आहे,” असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंचीही प्रतिक्रियारामाकडे, रावणाकडे धनुष्यबाण होता. पण विजय रामाचा झाला. सत्याचा विजय नेहमी होत आला आहे. अन्यायाविरोधात जे पेटून उठलेत त्यांचा विजय होईल. हा अत्याचार लोकशाहीवर होतोय. हा छत्रपतींचा महाराष्ट्र, धुतराष्ट्राचा नाही. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. अपात्रतेबाबत घटनातज्ञांनुसार सदस्यांचे अपात्र होऊ शकतात. हा ठरवलेला कट आहे का? धनुष्यबाण ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ओरबाडून घेऊ शकत नाही. नामर्द कितीही माजला तरी तो मर्द होत नाही अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेना