Join us

छातीवर झेलल्या गोळ्या, कशासाठी...? मातृभाषेसाठी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 11:29 AM

संवाद साधण्यासाठी भाषा हे एक प्रमुख माध्यम आहे. संवादाच्या गरजेतूनच अगदी प्राचीन काळापासून विविध भाषा उदयास आल्या. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संवाद साधण्यासाठी भाषा हे एक प्रमुख माध्यम आहे. संवादाच्या गरजेतूनच अगदी प्राचीन काळापासून विविध भाषा उदयास आल्या. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसजशी भाषा समृद्ध हाेत गेली, तसा त्या-त्या प्रदेशाचा विकास होत गेला. आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. भाषेचा सन्मान करण्यासाठीच हा दिवस साजरा करण्यात येतो. याबाबत जाणून घेऊ या.

भाषासमृद्ध भारत...

२२ भाषा अधिकृत आहेत, ज्यांना राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात स्थान आहे.

१,५९९ च्या आसपास बाेलीभाषा आहेत.

२७० भाषा कुणाची ना कुणाची मातृभाषा आहेत.

५३ काेटी लाेकांची मातृभाषा हिंदी आहे.

१० काेटींहून अधिक लाेकांची मातृभाषा बंगाली आहे.

९ काेटींहून अधिक लाेक मराठी बाेलतात.

८ काेटींपेक्षा जास्त लाेक तेलुगू भाषिक आहेत.

१२१ भाषा अशा आहेत, ज्या

१० हजारांपेक्षा जास्त लाेक बाेलतात.

७ भाषा अशा आहेत, ज्या बाेलणाऱ्यांची संख्या ७ लाख आहे.

३० भाषा अशा आहेत, ज्यांचे मूळ भाषक

१० लाख आहेत.

भारतातील अधिकृत भाषा काेणत्या?

मराठी, आसामी, उर्दू, ओडिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी आणि हिंदी.

सुरुवात कशी झाली?

फाळणीनंतर १९५२ मध्ये पूर्व पाकिस्तानात (बांगलादेश) तत्कालीन सरकारने अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता दिली हाेती. या विराेधात ढाका विद्यापीठातील काही विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी बंगाली या मातृभाषेसाठी आंदाेलन केले हाेते. त्यातून हिंसाचार झाला आणि पाेलिसांनी गाेळीबार केला. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला हाेता. सरकारने नमते घेतले आणि बंगाली भाषेलाही मान्यता दिली. भाषेसाठी प्राण देणाऱ्या या लाेकांच्या स्मरणार्थ युनेस्काेने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याची घाेषणा १९९९ मध्ये केली हाेती.

या देशांत आहे सर्वाधिक भाषा वैविध्य

ब्राझील २२१ भाषा

कॅमेरून २७४ भाषा

चीन ३०९ भाषा

ऑस्ट्रेलिया ३१२ भाषा

अमेरिका ३२८ भाषा

पापुआ न्यू गिनी ८४० भाषा

इंडाेनेशिया ७११ भाषा

नायजेरिया ५१७ भाषा

भारत ४५६ भाषा