घाई करा, भरतीच्या अर्जाचा आज आहे शेवटचा दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:52 AM2024-02-12T09:52:42+5:302024-02-12T09:53:25+5:30

पालिका शाळांमध्ये १,३४२ पदे रिक्त, ४ माध्यमांसाठी संधी.

today is the last day to apply for recruitment in bmc school in mumbai | घाई करा, भरतीच्या अर्जाचा आज आहे शेवटचा दिवस!

घाई करा, भरतीच्या अर्जाचा आज आहे शेवटचा दिवस!

मुंबई : महापालिकेच्या प्राथमिक शाळेत मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या माध्यमांच्या शिक्षकांची १३४२ पदे भरण्यात येणार आहेत. १२ फेब्रुवारी राेजी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.  राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंतही ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर छाननी करून मग त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. शिक्षण विभागामार्फत कागदपत्रांची पडताळणी करून मग त्यांना नियुक्तिपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली तरी गेल्या काही वर्षात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली होती. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा ८ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या १,१२९ शाळांमध्ये मिळून सध्या ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना काळानंतर पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. तसेच, सीबीएसईच्या शाळा, अन्य बोर्डांच्या शाळा, शैक्षणिक वस्तू वाटप यामुळे विद्यार्थी संख्या वाढली आहे. यामुळे शिक्षण विभागाचे कौतुक होत असले तरी शिक्षकांची कमतरता हा प्रश्न मात्र अद्याप सुटलेला नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तर आधीच पालिका शाळांमध्ये बिघडलेले आहे. मोठ्या संख्येने पुरेसे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालिका शाळांमध्ये शिक्षकांची पदे कधी भरणार, असा सवाल केला जात होता.

शिक्षकांच्या जागा रिक्त असल्या तरी सध्या तासिका तत्त्वावर काही सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची कमतरता भरून काढली आहे. परंतु, या भरतीमुळे आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक मिळतील. - राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी 

 

Web Title: today is the last day to apply for recruitment in bmc school in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.