मुंबईतील तीनही रेल्वे मार्गांवर आज ‘जम्बो’ ब्लॉक; मेल-एक्स्प्रेसलाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 03:14 AM2017-11-12T03:14:10+5:302017-11-12T03:14:26+5:30

रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. मध्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाउन मार्गावर आणि हार्बरच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे या मार्गांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.

Today 'jumbo' block on all three railway routes in Mumbai; Mail-Express also hit | मुंबईतील तीनही रेल्वे मार्गांवर आज ‘जम्बो’ ब्लॉक; मेल-एक्स्प्रेसलाही फटका

मुंबईतील तीनही रेल्वे मार्गांवर आज ‘जम्बो’ ब्लॉक; मेल-एक्स्प्रेसलाही फटका

Next

मुंबई : रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. मध्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाउन मार्गावर आणि हार्बरच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे या मार्गांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.
मुलुंड ते माटुंगा जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. कल्याणहून सकाळी १०.३८ ते दुपारी ३.५७ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर सुटणाºया सर्व उपनगरीय गाड्या, दिवा ते परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या परळ स्थानकापर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. परळ स्थानकापासून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सुटणाºया डाउन मार्गावरील जलद गाड्या, निर्धारित थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील. त्यामुळे त्या अंतिम स्थानकावर २० मिनिटे उशिराने पोहोचतील.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान ब्लॉक असेल. या काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद लोकल धावणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.
वडाळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ११.३४ वाजल्यापासून दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाºया, तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/अंधेरीच्या दिशेने जाणाºया उपनगरीय गाड्या रद्द केल्या आहेत. पनवेल/बेलापूर/ वाशीवरून सकाळी ९.५३ वाजल्यापासून दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाºया तसेच अंधेरी/वांद्रेवरून सकाळी १०.४५ वाजल्यापासून सायंकाळी ५.०९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाºया उपनगरीय लोकल रद्द केल्या आहेत. ब्लॉक काळात कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून विशेष लोकल धावतील.

मेल-एक्स्प्रेसलाही फटका
जम्बो ब्लॉकचा मेल-एक्स्प्रेसलाही फटका बसेल. ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडीचा प्रवास दिवा स्थानकावर संपेल. ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातून सुटेल. ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजरच्या प्रवाशांसाठी दादर ते दिवा विशेष उपनगरीय गाडी चालविण्यात येईल. ही गाडी दादरहून ३.४० वाजता सुटेल. ठाणे स्थानंकावर ०४.०६ वाजता पोहोचेल आणि ०४.१३ वाजता दिवा स्थानकावर पोहोचेल.

Web Title: Today 'jumbo' block on all three railway routes in Mumbai; Mail-Express also hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.