आज रेल्वे प्रवाशांचे ‘जम्बो’ हाल, तिन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 02:23 AM2018-03-25T02:23:43+5:302018-03-25T02:23:43+5:30

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी जम्बो मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भार्इंदरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तर मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर नेरुळदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६पर्यंत आणि कल्याण-ठाणे दरम्यानच्या अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२०पर्यंत जम्बो मेगाब्लॉक असेल.

Today, the jumbo mega block on railway lines, jumbo mega block on all three routes | आज रेल्वे प्रवाशांचे ‘जम्बो’ हाल, तिन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक

आज रेल्वे प्रवाशांचे ‘जम्बो’ हाल, तिन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक

Next

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी जम्बो मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भार्इंदरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तर मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर नेरुळदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६पर्यंत आणि कल्याण-ठाणे दरम्यानच्या अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२०पर्यंत जम्बो मेगाब्लॉक असेल. त्यामुळे प्रवाशांचे ‘जम्बो’ हाल होणार आहेत.
बोरीवली ते भार्इंदरदरम्यानच्या धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. याउलट वाशी आणि बेलापूर स्थानकादरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर, तर तुर्भे व नेरुळ दरम्यान अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरून लोकल धावतील. नेरुळ येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६पर्यंत विशेष ब्लॉक आहे. ब्लॉक काळात वाशी आणि बेलापूर स्थानकादरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर तर तुर्भे व नेरुळ दरम्यान अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल धावतील.
बेलापूर / पनवेल येथून वडाळा स्थानकाकडे जाणाऱ्या लोकल फेºया सकाळी ९.०८ ते सायंकाळी ५.३० वाजपर्यंत बंद राहतील. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून बेलापूर / पनवेल मार्गावर सकाळी ९.४४ ते सायंकाळी ५.५० वाजेपर्यंत सुटणाºया सर्व लोकल फेºया रद्द केल्या आहेत. याचप्रमाणे पनवेल ते ठाणे डाउन मार्गावर सकाळी ९.३९ ते सायंकाळी ५.३४ या वेळेत एकही लोकल धावणार नाही. ठाणेहून पनवेलसाठी अप डाउन मार्गावर सकाळी ९.४८ ते सायंकाळी ५.५७ या वेळेत धावणाºया लोकल फेºयाही रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावर अप धिम्या मार्गावरील सर्व लोकल अप जलद मार्गावर धावतील. विरार/वसई रोड ते बोरीवली/गोरेगाव दरम्यान, सर्व विरार डाउन जलद गाड्या जलद मार्गावरून धावतील. तसेच सर्व उपनगरीय गाड्या भार्इंदर स्थानकावर थांबतील.

कल्याण-ठाणे दरम्यानच्या अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे. कल्याणहून सुटणाºया धिम्या व अप फास्ट मार्गावरील सकाळी १०.४८ ते दुपारी ४.१४ वाजेपर्यंतच्या सर्व लोकल कल्याण आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर वाहतूक सुरू राहील. ब्लॉक काळात ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर लोकल थांबणार नाही. या स्थानकादरम्यानच्या प्रवाशांनी ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण या मार्गावरील ब्लॉक कालावधी वैध तिकिटांवर प्रवास करण्याची परवानगी आहे.

- डाउन जलद मार्गावरील सीएसएमटीहून सुटणाºया गाड्या सकाळी १०.०५ ते दुपारी २.५४ या काळात डाउन फास्ट मार्गावरील लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबतील. डाउन जलद मार्गावरील कल्याणहून सुटणाºया गाड्या सकाळी ११.२३ ते दुपारी ४.०२ या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्टेशनवरही थांबतील.

ठाणे-वाशी
विशेष लोकल
ब्लॉक दरम्यान विशेष उपनगरीय रेल्वे सेवा सीएसएमटी/वाशी आणि पनवेल / बेलापूर दरम्यान गाड्या धावतील, तसेच ठाणे-वाशी विशेष लोकल सेवा ही परतीच्या प्रवासासाठी सुरू ठेवण्यात आली आहे.

Web Title: Today, the jumbo mega block on railway lines, jumbo mega block on all three routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.