Join us

आजपासून ‘लालपरी’ जिल्ह्याबाहेरही धावणार, खासगी बस वाहतुकीला परवानगी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 6:21 AM

एसटी महामंडळाला २४०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले, अशी माहिती मंत्री परब यांनी दिली.

मुंबई : दोन दिवसांवर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. हा निर्णय गुरुवारपासून अंमलात येणार आहे. ्नलॉकडाऊन उठविल्यानंतर राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू केल्या होत्या, मात्र सार्वजनिक वाहतूक सुरू न केल्याने त्याविरोधात गेल्याच आठवड्यात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलन केले होते. कोरोनामुळे २२ मार्चपासून एसटी बससेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार देणेदेखील अशक्य झाले होते. राज्य सरकारने ५०० कोटींचे कर्ज काढून एसटी महामंडळाला पगारासाठी पैसे दिले.2400 कोटींचा महसूल बुडाला११३ दिवस एसटी बससेवा बंद राहिली, त्यामुळे एसटी महामंडळाला २४०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले, अशी माहिती मंत्री परब यांनी दिली.>परराज्यातील विद्यार्थ्यांनाही आणलेमुंबई विभागात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीच एसटी बस सुरू करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी जिल्हातंर्गत बससेवा सुरू आहे.लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील लोकांना महाराष्ट्रात आणण्याचे काम एसटी महामंडळाने केले.राजस्थान मधील कोटा येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनादेखील एसटीने आणले, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.>एसटी बसने प्रवास करणाºया प्रवाशांना ई-पासची गरज नाही. मात्र मास्क वापरणे अनिवार्य आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जाईल. एसटी बस आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करणार असली तरी खासगी बस वाहतुकीला मात्र परवानगी नाही.- अनिल परब, परिवहन मंत्री