‘एफवाय’च्या प्रवेशाचा आज शेवटचा दिवस

By admin | Published: June 21, 2017 02:59 AM2017-06-21T02:59:18+5:302017-06-21T02:59:18+5:30

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी आॅनलाइन पूर्वप्रवेश नोंदणी करणे बंधनकारक होते

Today is the last day for the entrance of the FY | ‘एफवाय’च्या प्रवेशाचा आज शेवटचा दिवस

‘एफवाय’च्या प्रवेशाचा आज शेवटचा दिवस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी आॅनलाइन पूर्वप्रवेश नोंदणी करणे बंधनकारक होते. बुधवार, २१ जूनला पूर्वप्रवेश नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.
बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास पहिल्यांदाच आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य केले होते. मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष बीए, बीए (फ्रेंच स्टडी, जर्मन स्टडी), बीकॉम, बीएससी, बीएमएम, बीएसडब्ल्यू, बीएससी (आयटी), बीएससी (नॉटिकल सायन्स), बीएससी (होम सायन्स), बीएससी (एव्हिएशन), बीएससी (फॉरेन्सिक सायन्स), बीएससी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीकॉम (बी अ‍ॅण्ड आय), बीकॉम (ए अ‍ॅण्ड एफ), बीकॉम (एफ अ‍ॅण्ड एम), बीएमएस, बीएमएस, एमबीए, बीव्होक, लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचा असल्यास पूर्वप्रवेश नोंदणी केली पाहिजे. ९ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून, तीन लाख विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. २१ जूनला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थी पूर्वप्रवेश नोंदणी करू शकणार आहेत. आॅनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना े४े.्िरॅ्र३ं’४ल्ल्र५ी१२्र३८.ंू या संकेतस्थळावरील पूर्व प्रवेशासाठी एक विशेष लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक करून अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना अडचणी आल्यास ९३२६५५२५२५ या विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. २२ जूनला सायंकाळी ५ वाजता तेरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: Today is the last day for the entrance of the FY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.