Join us  

आॅनलाईन नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

By admin | Published: February 06, 2017 1:16 AM

खासगी शाळांमध्ये शिक्षणाच्या अधिकारानुसार गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. पण, काही खासगी शाळा याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

मुंबई: खासगी शाळांमध्ये शिक्षणाच्या अधिकारानुसार गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. पण, काही खासगी शाळा याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवार सायंकाळी ६ पर्यंत शाळेला मुदत वाढ देण्यात आली आहे. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) वंचित आणि दुर्बव घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांत प्रवेश दिला जातो. समाजातील गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळेत नर्सरी आणि पहिलीचे प्रवेश देण्यासाठी २५ टक्के आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.