Join us

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

By admin | Published: September 30, 2014 9:38 PM

सुपरवोट.......

सुपरवोट.......
...........................................................
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार आणि प्रसाराने जोर पकडला असतानाच १ ऑक्टोबर (बुधवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी तीननंतर कोणत्या राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज मागे घेतात? याकडे मतदारांचे लक्ष्य लागले असून, त्यानंतर कोणामध्ये किती जोरदार चुरस होईल? त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर जिल्हयात १० विधानसभा मतदार संघातून दाखल झालेल्या १९१ उमेदवारी अर्जांपैकी २६ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे आता केवळ १६५ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. मुंबई उपनगर जिल्हयात २७ सप्टेंबर रोजीपर्यंत राजकीय पक्षांच्या एकूण ५०४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. २९ सप्टेंबर रोजी ७६ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले. आणि आता ४२८ उमेदवार पात्र ठरले आहेत. दरम्यान, बाद झालेल्या उमेदवारांमध्ये चांदिवली विधानसभेतील भाजपाचे उमेदवार सीताराम तिवारी या उमेदवाराचा समावेश आहे. तर भायखळा विधानसभेतून राष्ट्रवादीचे कुलदीप पेडणेकर यांचा अर्ज बाद झाला आहे. एकूण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसेने स्वतंत्र चूल मांडल्याने कोणत्या विधानसभेत, कोणता पक्ष, कोणाला समर्थन देण्यासाठी कोणत्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी अप्रत्यक्षरित्या दबाव आणतो; हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)