म्हाडाच्या २१७ घरांसाठी आज सोडत; थेट प्रक्षेपणाची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 03:39 AM2019-06-02T03:39:27+5:302019-06-02T03:39:37+5:30
गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली होेणाऱ्या या समारंभात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे
मुंबई : म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरांसाठी आज सोडत काढली जाणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाईटवरून केले जाणार आहे.
या सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे http://lottery.mhada.gov.in आणि http://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहेत.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली होेणाऱ्या या समारंभात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे. या वेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांच्यासह म्हाडाचे अधिकारी उपस्थित राहतील.
यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटाकरिता १७० सदनिका व मध्यम उत्पन्न गटाकरिता ४७ सदनिकांचा समावेश आहे.