आज मॅरेथॉनमध्ये मुंबईकर धावणार

By admin | Published: January 17, 2016 01:30 AM2016-01-17T01:30:51+5:302016-01-17T01:30:51+5:30

जगभरातील मॅरेथॉनमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला रविवारी सकाळी सुरुवात होईल. १३ व्या मॅरेथॉनमध्ये देशी विदेशी धावपटंूसह ४० हजारांहुन अधिक

Today, Marathon will run in Mumbai | आज मॅरेथॉनमध्ये मुंबईकर धावणार

आज मॅरेथॉनमध्ये मुंबईकर धावणार

Next

मुंबई : जगभरातील मॅरेथॉनमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला रविवारी सकाळी सुरुवात होईल. १३ व्या मॅरेथॉनमध्ये देशी विदेशी धावपटंूसह ४० हजारांहुन अधिक मुंबईकर धावणार आहेत. पुर्ण मॅरेथॉनसाठी ४२.१९५ किमी, अर्ध मॅरेथॉनसाठी २१.०९७ किमी, वरिष्ठ नागरिकांसाठी ४.३ किमी आणि ड्रीम रनसाठी ६ किमी असा मार्ग ठरवण्यात आला आहे. मॅरेथॉन शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडण्यासाठी महापालिका, मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस असा फौजफाटा सज्ज आहे.
यंदा अर्ध मॅरेथॉनसाठी नवीन मार्गाची चोख व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे. रविवारी पहाटे ५.४० मिनिटांनी अर्ध मॅरेथॉन वरळी डेअरी येथून सुरु होणार आहे. राजीव गांधी सागरी सेतू मार्गे वरळी डेअरी, नेहरु सेंटर, जसलोक हॉस्पिटल, चौपाटी, हिंदू जिमखाना फ्लोरा फाऊंटन मार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे ती पुर्ण होईल.
हौशी स्पर्धकांची मॅरेथॉन छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथून पहाटे ५.४० मिनिटांनी आणि एलिट आणि भारतीय अ‍ॅथलीट (पुर्ण मॅरेथॉन- ४१. १९५ किमी ) मॅरेथॉन ७.२० मिनिटांनी सुरु होईल. या दोन्ही मॅरेथॉन सीएसटी येथेच पुर्ण होतील. मॅरेथॉनमध्ये कॉर्पोरेट अजिंक्यपद आणि पोलीस चषक या दोन रिले स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता सुरु होणाऱ्या कॉर्पोरेट स्पर्धेत ९१ आणि पोलीस चषकात १६ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघात ४ खेळाडू असून प्रत्येक खेळाडू १०.५ कि मी धाव घेणार आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्यांना फिरता चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
‘चॅम्प्यिन फॉर डिसेब्लीटी’ साठी (१.७५) स्पर्धक सीएसटी येथून सकाळी ७.३५ धावण्यास प्रारंभ करतील. आझाद मैदानाच्या गेट नं. ३ जवळ या स्पर्धेचा अंतिम टप्पा असेल. ‘वरिष्ठ नागरिकां’च्या (४.३ किमी) स्पर्धेला सीएसटी येथून सकाळी ८ वाजता आणि ‘द ड्रीम रन’ साठी (६ किमी)धावपटू सकाळी ९ वाजता सुरुवात करतील. दोन्ही स्पर्धांचा शेवट आझाद मैदानाच्या गेट नं. ३ जवळ होईल.
हौशी मॅरेथॉनसाठी ५ हजार १९० धावपटू धावणार असून त्यात ४ हजार ६२० पुरुष आणि ४०८ महिलांचा समावेश आहे. विविध देशांचे १३७ पुरुष धावपटू आणि २५ महिला धावपटू मॅरेथॉनमध्ये धावतील. अर्ध मॅरेथॉनसाठी ११६९५ पुरुष २६५३ महिला सहभागी होणार आहे. विदेशी ५६ पुरुषांचा तर २७ महिलांचा समावेश यात असणार आहे. ड्रीम रनसाठी १२ हजार ३४६ पुरुष ६ हजार ५८८ महिला धावपटू आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये ६३५ पुरुष आणि ३६४ महिला मॅरेथॉनचा आनंद लुटणार आहे. चॅम्पियन फॉर डिसेब्लिटीमध्ये २६६ पुरुष आणि ९७ महिला जिद्दीने मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना दिसतील. (क्रीडा प्रतिनिधी)

डॉक्टरही आॅन ड्युटी
मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी ५०० डॉक्टरांचा फौजफाटा सज्ज आहे. शिवाय विविध मार्गात २ उपचार केंद्र आणि १२ स्टेशनची उभारणी करण्यात आली. १० रुग्णवाहिका आणि ७ मेडिकल बाईक सेवेत असणार आहेत. स्पर्धकांसाठी १ लाख ३५ हजार लीटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मार्गावर २७ पाण्याचे स्टॉल उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ७२ फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलिस सज्ज : मॅरेथॉनसाठी मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिस सज्ज आहेत. मॅरेथॉन मार्गासाठी बहुतांशी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. आहे. मुंबईबाहेर जाणाऱ्या मार्गावर प्रसंगानुरुप योग्य ते बदल करण्यात येतील. दक्षिण मुंबईतील वाहतूकीचे बरेचसे मार्ग काहीअंशी बंद ठेवण्यात आले असून मुंबई मॅरेथॉनसाठी पोलीस सज्ज आहेत.
-मिलिंद भारांबे, वाहतूक पोलीस सह आयुक्त

Web Title: Today, Marathon will run in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.