आज ‘मेगा’हाल; मध्य, हार्बर रेल्वेमार्गांवर ब्लॉक, पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 03:22 AM2017-09-17T03:22:55+5:302017-09-17T03:23:14+5:30

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Today 'mega'hal; Central, Harbor rail lines, block on the highways and relief to passengers | आज ‘मेगा’हाल; मध्य, हार्बर रेल्वेमार्गांवर ब्लॉक, पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा

आज ‘मेगा’हाल; मध्य, हार्बर रेल्वेमार्गांवर ब्लॉक, पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री पश्चिम रेल्वेवर दोन रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात आले. यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. यामुळे अप मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावर वळविण्यात येईल. ब्लॉक कालावधीत ठाकुर्लीसह कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांत लोकल थांबणार नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी डाउन जलद मार्गावरील लोकलला सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ दरम्यान आणि अप जलद मार्गावरील लोकलला सकाळी १०.२८ ते दुपारी ३.०८ या नियमित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे मध्य मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील.

पनवेलसाठी
विशेष ट्रेन
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत.
सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक सकाळी ९.५२ ते दुपारी ५.०९ वाजेपर्यंत बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला फलाट क्रमांक ८ वरून पनवेलसाठी विशेष लोकल चालवण्यात येईल.
ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य आणि पश्चिम मार्गाने त्याच तिकीट किंवा पासावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Today 'mega'hal; Central, Harbor rail lines, block on the highways and relief to passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.