आज ओपीडी, दवाखाने राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:25 AM2020-12-11T04:25:05+5:302020-12-11T04:25:05+5:30

आयएमए : अपघातग्रस्त रुग्णांसह, प्रसूतीसेवा सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) ११ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ...

Today OPD, clinics will remain closed | आज ओपीडी, दवाखाने राहणार बंद

आज ओपीडी, दवाखाने राहणार बंद

Next

आयएमए : अपघातग्रस्त रुग्णांसह, प्रसूतीसेवा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) ११ डिसेंबर रोजी राष्ट्रीय पातळीवर बंद पुकारला आहे. यामध्ये सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येतील.

आयुर्वेद विद्यार्थ्यांना ॲलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचनेविरुद्ध आयएमएने राष्ट्रीय पातळीवर हे आंदोलन सुरू केले आहे. तातडीच्या सेवा सुरू राहतील. यात आय.सी.यू., अपघातात सापडलेल्या रुग्णांसाठी असलेली अत्यावश्यक सेवा, प्रसूतीसेवा सुरू राहतील.

या आंदोलनात राज्यातील आयएमएच्या २१९ शाखांमधील ४५ हजार डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये पंजीकृत असलेले एकूण १ लाख १० हजार डॉक्टर्स सहभागी होतील. मेडिकल स्टुडन्टस नेटवर्क (एमएसएन) या आयएमएच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेतर्फे एमबीबीएसचे शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील ३६ सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील १५ हजार वैद्यकीय विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. याशिवाय राज्यातील खासगी आणि सरकारी महाविद्यालयात आणि अनेक नामांकित इस्पितळात पदव्युत्तर शिक्षण घेणारे १५ हजार ज्युनिअर डॉक्टर्स महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (मार्ड) आणि आयएमएच्या ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क (जेडीएन) सहभागी होतील.

या आंदोलनाला आधुनिक वैद्यक शास्त्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या ३४ संस्थांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या पदव्युत्तर आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसह सर्व भारतभरातील ६ लाख आयएमए सदस्य तसेच राज्यातील १,५०,००० डॉक्टर्स आणि पदवीपूर्व तसेच पदवीपूर्व विद्यार्थीही यात सहभागी होतील.

* काही प्रमुख मागण्या

- सीसीआयएमची अधिसूचना मागे घ्यावी.

- राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या चार समित्या त्वरित रद्द कराव्यात.

- वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीतजास्त उपयोग कसा होईल यावर सरकारने भर द्यावा.

Web Title: Today OPD, clinics will remain closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.