आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर प्रवाशांचे ‘मेगा’हाल, कुर्ला-पनवेल विशेष ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:35 AM2017-12-03T00:35:56+5:302017-12-03T00:36:18+5:30
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवार, ३ डिसेंबर रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. पश्चिम मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवार, ३ डिसेंबर रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. पश्चिम मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ४.४० पर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल.
रेल्वेच्या मध्य मार्गावर सकाळी १०.५४ ते दुपारी ४.१९ वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाºया अप जलद मार्गावरील सर्व सेवा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाºया सर्व डाऊन जलद मार्गाच्या सेवा आपल्या निर्धारित थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि आपल्या निर्धारित स्थानकांवर १५ मिनटे उशिरा पोहोचतील.
पश्चिम मार्गावर जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला असून या वेळेत धिम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गांवर चालवण्यात येतील. पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर स्थानकावर जलद मार्गासाठी फलाट नसल्याने या स्थानकावर लोकल थांबणार नाहीत.
मेल-एक्स्प्रेसनाही फटका
५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी सेवा दिवा स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल. आणि ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातून सुटेल. ५०१०३ गाडीच्या प्रवाशांसाठी दादर ते दिवा विशेष उपनगरीय गाडी चालविण्यात येईल. ही विशेष गाडी दादरहून ३.४० वाजता सुटेल. ब्लॉक काळात मुंबईला येणाºया मेल आणि एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटे उशिरा पोहोचतील.
कुर्ला-पनवेल विशेष ट्रेन
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात या मार्गावर कोणत्याही लोकल धावणार नाहीत. ब्लॉक काळात कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून कुर्ला-पनवेल विशेष ट्रेन चालविण्यात येतील.