Join us

आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर ब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 5:46 AM

अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने रविवार, २८ जानेवारी रोजी मध्य आाणि हार्बर मार्गावर ब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप व डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसल्याने ‘परे’वासी सुखावले आहेत.

मुंबई - अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने रविवार, २८ जानेवारी रोजी मध्य आाणि हार्बर मार्गावर ब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप व डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसल्याने ‘परे’वासी सुखावले आहेत.मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाºया डाऊन जलद आणि अर्ध जलद लोकल रविवारी सकाळी ९.२५ ते दुपारी २.५४ दरम्यान घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. डाऊन जलद लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून धावतील. अंतिम स्थानकांवर त्या २० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याणहून सुटणाºया अप जलद आणि अर्ध जलद लोकल सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ दरम्यान दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. शेवटच्या स्थानकांवर त्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.सीएसएमटी-कुर्ला, वाशी-पनवेल दरम्यान विशेष ट्रेनहार्बर मार्गावर सकाळी पनवेल/बेलापूर/वाशी स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाºया सर्व लोकल सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ दरम्यान बंद असतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी / बेलापूर / पनवेलला सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल फेºया चालविण्यात येतील.

टॅग्स :मुंबई लोकलभारतीय रेल्वे