Join us  

आज आरटीओ सुरू राहणार

By admin | Published: October 22, 2015 2:12 AM

दसऱ्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी सोने खरेदीबरोबरच वाहन खरेदीही मोठ्या प्रमाणात होते. वाहन खरेदी केल्यावर त्याची नोंदणी आरटीओकडे केली जाते.

मुंबई : दसऱ्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवशी सोने खरेदीबरोबरच वाहन खरेदीही मोठ्या प्रमाणात होते. वाहन खरेदी केल्यावर त्याची नोंदणी आरटीओकडे केली जाते. हे पाहता दसऱ्याच्या दिवशी नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा. तसेच शासकीय महसूलही मोठ्या प्रमाणात मिळावा यासाठी २२ आॅक्टोबर या दसऱ्याच्या दिवशी राज्यातील सर्व आरटीओ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी आरटीओतील नवीन नोंदणी विभाग व करवसुली विभाग सुरू राहील, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.