आज लोकमत सखींसाठी ‘ती फुलराणी’चा प्रयोग

By Admin | Published: April 14, 2017 03:46 AM2017-04-14T03:46:41+5:302017-04-14T03:46:41+5:30

महिलांच्या सक्षमीकरण आणि सशक्तीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘लोकमत’ सखी मंचने खास सखींसाठी ‘ती फुलराणी’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे.

Today she is using 'She Phulrani' for the people | आज लोकमत सखींसाठी ‘ती फुलराणी’चा प्रयोग

आज लोकमत सखींसाठी ‘ती फुलराणी’चा प्रयोग

googlenewsNext

मुंबई : महिलांच्या सक्षमीकरण आणि सशक्तीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘लोकमत’ सखी मंचने खास सखींसाठी ‘ती फुलराणी’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे. हा प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे १४ एप्रिल रोजी सायंकाळी ३.३० वाजता रंगणार आहे. नव्या
वर्षात नोंदणी केलेल्या सखींसाठी म्हणजेच, २०१७मध्ये सभासद
नोंदणी केलेल्या सखींसाठी हा प्रयोग आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष नंतर आता नव्या ‘ती फुलराणी’ नाटकात अभिनेत्री हेमांगी कवी हिने या भूमिकेचे आव्हान स्वीकारले आहे.
अष्टगंध एंटरटेण्मेंट निर्मित एँडोनिस एंटरप्रायजेस प्रकाशित ‘ती फुलराणी’ या नाटकाची निर्मिती धनंजय चाळके यांनी केली आहे. फुलराणीच्या भूमिकेतील हेमांगी कवीसोबत प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ. गिरीश ओक आहेत.
या नाटकाचे सूत्रधार नितीन नाईक आहेत. सोबत मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, विजय पटवर्धन, निरंजन नारकर, निरंजन जावीर, हरीश तांदळे, दिशा दानडे, सुनील जाधव, अंजली मायदेव या कलाकारांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today she is using 'She Phulrani' for the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.