Join us  

व्होटर स्लीपसाठी आज विशेष मोहीम

By admin | Published: October 12, 2014 12:49 AM

विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार क्रमांक कोणत्या मतदान केंद्रावर आहे,

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार क्रमांक कोणत्या मतदान केंद्रावर आहे, हे समजणो सोयीचे जावे म्हणून मार्गदर्शक ठरणारी व्होटर स्लीप रविवारी स्थानिक मतदान केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. 
मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवण्यात येणा:या विशेष मोहिमेंतर्गत रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान व्होटर स्लीपचे वाटप करण्यात येईल. जिल्हाधिका:यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणो घरपोच व्होटर स्लीप मोहिमेंतर्गत हे काम करण्यात आले. तरी शिल्लक राहिलेल्या किंवा व्होटर स्लीप मिळाली नसलेल्या मतदारांसाठी विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक मतदान केंद्रांवर व्होटर स्लीप वाटण्यात येतील. प्रशासनातर्फे वाटण्यात येणा:या व्होटर स्लीपवर मतदाराचा फोटो असणार आहे. त्यामुळे फोटो असलेल्या व्होटर स्लीपचा वापर मतदारांना केंद्रांवर मतदान करताना ओळखपत्र म्हणूनही करता येईल. या स्लीपवर मतदाराचे नाव, मतदार क्रमांक, मतदान केंद्र आणि इतर पूरक माहितीचा समावेश असेल. (प्रतिनिधी)