आज होणार ‘बीएमए’ची लीडरशिप इन सोशल रिस्पॉन्सिब्लिटी परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:00 AM2018-02-21T06:00:21+5:302018-02-21T06:00:43+5:30

‘बीएमए लीडरशिप इन सोशल रिस्पॉन्सब्लिटी’ परिषदेचे आणि ३९ व्या बीएमए कॉर्पोरेट लीडरशिप पुरस्कार सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे

Today will be the 'BMA Leadership in Social Responsibility Council' | आज होणार ‘बीएमए’ची लीडरशिप इन सोशल रिस्पॉन्सिब्लिटी परिषद

आज होणार ‘बीएमए’ची लीडरशिप इन सोशल रिस्पॉन्सिब्लिटी परिषद

Next

मुंबई : ‘बीएमए लीडरशिप इन सोशल रिस्पॉन्सब्लिटी’ परिषदेचे आणि ३९ व्या बीएमए कॉर्पोरेट लीडरशिप पुरस्कार सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारीला मुंबईतील मॅरिएट हॉटेलमध्ये ही परिषद आणि पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. ‘लोकमत’ या परिषदेचे माध्यम प्रायोजक आहे.
बॉम्बे मॅनजमेंट असोसिएशनतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती सहभागी होणार असून विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन पर्सिस्टंट फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त डॉ. आनंद देशपांडे करणार आहेत. तसेच, टीसीएसचे एम्बेडडेड सिस्टीम अ‍ॅण्ड रोबोटिक्सचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ संजय किंबहुणे, महिंद्रा गु्रपचे चीफ सस्टेंनब्लिटी आॅफीसर अर्निबन घोष, येस बँकचे एक्झिकेटिव्ह वाईस पे्रसिडंट अनुप गुरुव्हुगिरी, अवतार ग्रुपचे संस्थापक सौंदर्य राजेश, मॉ फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मेहता, केअर नेक्स्ट इनोव्हेशन्सचे सहसंस्थापक शंतनू पाठक, टिसचे सेंटर फॉर सोशल आंत्रप्युनोरशीपचे अध्यक्ष प्रा. सत्यजित मजुमदार, एक्सेल इंडस्ट्रीचे अध्यक्ष अश्विनी श्रॉफ, रोटी बँकचे बँक आणि माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन, बीएएसएफ इंडिया लि.चे हेड कॉर्पोरेट अफेअरर्सचे सुनिता सुळे, सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्समेंट फिलांट्रॉफीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नोशिर दाद्रावाला उपस्थित राहणार आहेत. बीएमए पुरस्कार सोहळ््यासाठी बँक आॅफ बडोदाचे अध्यक्ष रवी व्यंकटेशन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, बी-स्कूल, कॉर्पोरेट्स, परोपकारी आणि सामाजिक उद्योजक हे सरकारवर प्रभाव निर्माण करु शकतात का, तसेच सरकारचे कामकाज प्रभावीपणे सुरु आहे का, अहवाल देण्यासाठी त्यांना मदत करु शकतात का, तसेच व्यवसाय, उद्योग धंदा या विषयी या परिषदेत चर्चा होणार आहे. या परिषदेत स्ट्रॅटेजी आणि मॉडेल्सविषयीही चर्चा करण्यात होणार आहे. सध्याचा ट्रेण्ड, नवीन संकल्पना, नेटवर्किंग आणि खुल्या व्यासपीठावर चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
२० व्या शतकातील व्यवस्थापन गुरु डॉ. सी. के. प्रल्हाद यांनी ‘वेल्थ अ‍ॅट द बॉटम आॅफ पिरॅमिड’ ही संकल्पना मांडली आहे. कॉर्पोरेटस हे नेहमीच स्मार्ट आणि फायदेशीर गुंतवणुकदारांच्या शोधात असतात. तर, दुसरीकडे लाभार्थी आणि मध्यस्थांना गुंतवणूकदार आणि संसाधनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी योग्य संधीच्या शोधात असतात. सीएसआर ही सर्वांत मोठी संधी
आहे.
सध्या कॉर्पोरेट जगतातील सीएसआर फक्त सद्भावना आणि ब्रॅण्डची ओळख निर्माण करणे आणि देणगीसाठी वापरला जात नाही.
आंत्रप्युनोर आॅफ द इयर, मॅनेजमेंट वूमन अचिर्व्हर आॅफ द इयर, आंत्रप्युनोर आॅफ द डिकेड, लाईफ टाईम अचिव्हमेंट, स्टार्ट-अप मॅन आॅफ द इयर आणि ज्युरी स्पेशल मेन्शन आॅफ द इयर या विभागांमध्ये पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. टीसीएसचे माजी अध्यक्ष एस. रामादोराई, हरिभक्ती गु्रपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेश हरीभक्ती, एनआयटीआयईचे संचालक करुणा जैन यांनी ज्युरी मेंबर म्हणून काम केले आहे.
आंत्रप्युनोर आॅफ द डिकेड पुरस्कार राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा, लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार एम.ए. नाईक, मॅनेजमेंट मॅन आॅफ द इयर भास्कर भट, मॅनेजमेंट वूमन आॅफ द इयर उषा अनंथसुब्रमण्यम, आंत्रप्युनोर आॅफ द इयर डॉ. आनंद देशपांडे, स्टार्ट अप मॅन आॅफ द इयर शशिकांत सूर्यनारायणन, ज्युरी स्पेशल मेन्शन सब्यॉची मुखर्जी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Today will be the 'BMA Leadership in Social Responsibility Council'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.