Join us

आजचा दिवस मुंबईसाठी खड्डेमुक्तीचा होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 6:08 AM

महापालिकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे खड्डे बुजविण्याची मुदत संपत आली आहे.

मुंबई : महापालिकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे खड्डे बुजविण्याची मुदत संपत आली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी खड्डे बुजविण्याच्या मोहिमेत व्यत्यय आणत होत्या. यामुळे एकीकडे खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदार व अधिकाऱ्यांची तारंबळ उडाली असताना खड्डयांचे राजकारण रंगात आले आहे.सर्वाेच्च न्यायालयानेच हजेरी घेतल्यामुळे महापालिकेची झोप उडाली आहे. त्यातच कल्याण आणि नवी मुंबईत खड्डयांमुळे पाचजण मृत्युमुखी पडल्याने मुंबईतही खड्डे तात्काळ भरण्यासाठी पालिकेवर दबाव वाढतो आहे. तर विरोधी पक्षांनीही खड्डयांवरून सत्ताधारी पक्षाबरोबरचं महापालिका प्रशासनालाही धारेवर धरले आहे. यामुळे पुढील ४८ तासांमध्ये मुंबईतील सर्व खड्डे बुजविण्याचे आश्वासन प्रशासनाने गुरूवारी रात्री महासभेत दिले.त्यानुसार शनिवारी रात्री ही मुदत संपत असल्याने रविवारी म्हणजेच उद्या मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा नसेल, अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे तातडीची बैठक घेऊन ठेकेदारांना कामाला लागण्याचा इशारा महापालिकेने दिला.मात्र मुंबईत ३५८ खड्डेचं शिल्लक होते, असा पालिकेचा दावा आहे. त्यामुळे उद्यापर्यंत मुंबई खड्डेमुक्त न झाल्यास पालिका प्रशासन आपला बचाव कसा करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.>ते खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याचेमहापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शनिवारी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. खड्डे भरण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र पश्चिम द्रुतगती महामार्गावर, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यांवर खड्डे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.>कोल्डमिक्सचा तुटवडा?महापालिकेच्या वरळी येथील कार्यशाळेत २९८ टन कोल्डमिक्स तयार करून सर्व विभाग कार्यालयांमध्ये मागणीनुसार पाठविण्यात आले आहे. मात्र संपूर्ण मुंबईत अडीच हजार टन कोल्डमिक्सची आवश्यकता आहे. त्यामुळे रातोरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोल्डमिक्स कसे तयार करणार? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.>शिवसेनेची पहारेकºयांवर निबंध स्पर्धाशिवसेनेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे सांताक्रूझ पूर्व या भाजपाचे वर्चस्व असलेल्या प्रभागात साने गुरूजी शाळेजवळ खड्डयांभोवती विद्यार्थ्यांना बसवून पारदर्शकता, पहारेकरी यावर चित्रकला निबंध स्पर्धा घेतली.>पावसाचा व्यत्ययकोल्डमिक्स तंत्रज्ञान वापरून मुंबईतील खड्डे भरण्यात येत आहेत. हे तंत्रज्ञान पावसाळ्यातही प्रभावी ठरत असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र कोल्डमिक्स योग्य पद्धतीने न भरल्यास खड्डे पुन्हा उखडत आहेत. त्यातच पावसाच्या हजेरीने अडचणी वाढत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :खड्डेमुंबई