मुंबई : पश्चिम रेल्वेवर महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला विशेष लोकलला शनिवारी २६ वर्षे पूर्ण झाली. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र लोकल ही संकल्पना पश्चिम रेल्वेने ६ मे १९९२ रोजी सत्यात उतरवली होती. चर्चगेट ते बोरीवली स्थानकांदरम्यान ही लोकल सुरू करण्यात आली होती.चर्चगेट ते बोरीवली स्थानकांदरम्यानच्या या महिला विशेषला महिला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला. शिवाय महिला प्रवाशांना हक्काची लोकल मिळाल्यामुळे महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते. प्रवाशांनी महिला विशेष लोकल विरारपर्यंत चालविण्याची मागणी केली.अखेर प्रवाशांच्या आग्रहास्तव १९९३मध्ये चर्चगेट-विरार स्थानकांदरम्यान महिला लोकलचा विस्तार करण्यात आला. सद्य:स्थितीत अप आणि डाऊन मार्गांवर बोरीवली-चर्चगेटसह विरार-चर्चगेट, भार्इंदर-चर्चगेट आणि वसई रोड-चर्चगेट या स्थानकांदरम्यान एकूण ८ महिला विशेष लोकल फेऱ्या खास महिलांसाठी सुरू आहेत.
आज महिला विशेष लोकलची २६ वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 5:39 AM