‘सहकारधुरीण’ला आज पुरस्कार

By Admin | Published: February 21, 2016 02:22 AM2016-02-21T02:22:03+5:302016-02-21T02:22:03+5:30

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. प्रा. वि.ह. कुळकर्णी पारितोषिकासाठी यंदा ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या ‘सहकारधुरीण’ विठ्ठलराव विखे-पाटील या चरित्रग्रंथाची निवड

Today's award to 'Sahakar Dhuran' | ‘सहकारधुरीण’ला आज पुरस्कार

‘सहकारधुरीण’ला आज पुरस्कार

googlenewsNext

मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. प्रा. वि.ह. कुळकर्णी पारितोषिकासाठी यंदा ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या ‘सहकारधुरीण’ विठ्ठलराव विखे-पाटील या चरित्रग्रंथाची निवड करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारी रोजी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
कै. प्रा. वि.ह. कुळकर्णी यांच्या कन्या इरावती कुळकर्णी व त्यांचे बंधू यांनी वडिलांच्या स्मारकासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला २० हजार रुपये अनामत देणगी दिली आहे. या देणगीच्या व्याजातून १ हजार १०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येते. या पुरस्कारासाठी पत्रकार शीतल करदेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
त्याचप्रमाणे कवी प्रफुल्लदत्तांची स्मृती व कार्य चिरंतन राहावे या उद्देशाने कवी प्रफुल्लदत्त स्मारक समितीने दिलेल्या १५ हजार रुपयांच्या अनामत देणगीच्या व्याजातून कित्येक वर्षांपासून पारितोषिक आदर्श शिक्षक, उदयोन्मुख उत्तम कवी आणि कुशल संपादक या फिरत्या क्रमाने असे प्रत्येक गटात एक दिले जाते. (प्रतिनिधी)

Web Title: Today's award to 'Sahakar Dhuran'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.