Join us

म्हाडाच्या घरांचा आज अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 05:48 IST

स्वस्तातल्या घरांच्या लॉटरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या म्हाडा प्राधिकरणाचा या वर्षीचा अर्थसंकल्प ५ मार्चला म्हाडाच्या बैठकीत सादर केला जईल.

मुंबई : स्वस्तातल्या घरांच्या लॉटरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या म्हाडा प्राधिकरणाचा या वर्षीचा अर्थसंकल्प ५ मार्चला म्हाडाच्या बैठकीत सादर केला जईल.सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाच्या म्हाडाच्या अर्थसंकल्पात घरांच्या बांधणीसह पंतप्रधान आवास योजनेसाठी भरीव तरतूद केली जाईल. मुंबई, कोकणासह राज्यभरात हजारो घर बांधण्याचे म्हाडाचे ध्येय आहे. त्यानुसार जमीन खरेदीसाठी तरतूद करण्यात येत आहे. वसाहतींमधील पायाभूत सेवा-सुविधांवरही तरतूद करण्यात येत आहे. दरम्यान, म्हाडाच्या घरांच्या किमती मागील काही वर्षांपासून वाढत आहेत. परिणामी, या किमती स्थिर किंवा कमी करण्यासाठी म्हाडा काय प्रयत्न करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.