कमला मिल मालकाच्या जामिनावर आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:38 AM2018-05-17T06:38:41+5:302018-05-17T06:38:41+5:30

कमला मिलचा मालक रमेश गोवानी याने केलेल्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय गुरुवारी निर्णय घेईल. मंगळवारी उच्च न्यायालयाने रमेश गोवानीच्या वकिलांचा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकला.

Today's decision on the bail application of Kamala Mill owner | कमला मिल मालकाच्या जामिनावर आज निर्णय

कमला मिल मालकाच्या जामिनावर आज निर्णय

Next

मुंबई : कमला मिलचा मालक रमेश गोवानी याने केलेल्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय गुरुवारी निर्णय घेईल. मंगळवारी उच्च न्यायालयाने रमेश गोवानीच्या वकिलांचा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकला. त्यानंतर, न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला. २९ डिसेंबर २०१७ रोजी कमला मिलला लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांनी कमला मिलचा मालक रमेश गोवानी याला अटक केली. तेव्हापासून गोवानी जेलमध्ये आहे. ‘वन अबव्ह’ व ‘मोजोस बिस्ट्रो’ या पब्सनी नियमांचे उल्लंघन केल्याबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हती, असे गोवानी याने जामीन अर्जात म्हटले आहे.
गोवानीने उच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये जामीन अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाला उन्हाळ्याची सुट्टी लागेपर्यंत त्याच्या अर्जावर सुनावणी न झाल्याने, त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठविले. या अर्जावर उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी पूर्ण झाली. न्या. विजय अचलिया यांनी गुरुवारी निकाल देऊ, असे स्पष्ट केले

Web Title: Today's decision on the bail application of Kamala Mill owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.