अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीला आजच्या दिवसाची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:12 AM2020-09-04T02:12:07+5:302020-09-04T02:12:40+5:30

पहिल्या नियमित फेरीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत मिळणार आहे. सोबतच शिक्षण संचालनालयाकडून दुसऱ्या नियमित फेरीसाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

Today's extension to the first round of the eleventh entry | अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीला आजच्या दिवसाची मुदतवाढ

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीला आजच्या दिवसाची मुदतवाढ

Next

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी रविवारी ३० आॅगस्ट रोजी जाहीर झाली. मात्र कोरोना स्थितीमुळे या यादीत अलॉट झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्यास विलंब होत आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
पहिल्या नियमित फेरीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत मिळणार आहे. सोबतच शिक्षण संचालनालयाकडून दुसऱ्या नियमित फेरीसाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या २ लाख १२ हजार १५२ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या यादीत तब्बल निम्म्याहून अधिक १ लाख १७ हजार ५२० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला आहे. ४० हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. गुरुवारी संध्याकाळी ७ पर्यंत अकरावी प्रवेशासाठी ७० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चिती केली आहे.
 विद्यार्थ्याला प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याने आपल्या लॉगइनमध्ये प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन क्लिक करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा आणि अ‍ॅडमिशन लेटरची प्रिंट काढून ठेवावी. केवळ प्रोसिड केले म्हणजे प्रवेश झाला असे होत नाही, हे लक्षात घ्यावे, असे नमूद केले आहे.

नियमित फेरी - २ चे वेळापत्रक

४ सप्टेंबर - (रात्री १० वाजता) नियमित प्रवेश फेरी २ साठी रिक्त पदे दर्शवणे
५ ते ७ सप्टेंबर - नियमित फेरी - २ साठी विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम (भाग-२) भरणे सुरू
८ ते ९ सप्टेंबर - डेटा प्रोसेसिंगसाठी राखीव वेळ
१० सप्टेंबर रोजी १० वाजता नियमित प्रवेश फेरी - २ ची गुणवत्ता यादी जाहीर करणे
१० सप्टेंबर सकाळी ११ ते १२ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत - दुसºया यादीतील प्रवेश निश्चित करणे
१२ सप्टेंबर रात्री १० वाजता - प्रवेशाची नियमित फेरी - ३ साठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे

Web Title: Today's extension to the first round of the eleventh entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.