Join us

Today's Fuel Price : पेट्रोल 17 पैसे तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 8:02 AM

Today's Fuel Price : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 17 पैसे तर डिझेलचे दर 16 पैशांनी स्वस्त झाले आहेत.

ठळक मुद्देपेट्रोल प्रतिलिटर 83.07 रुपये, डिझेल प्रतिलिटर 75.76 रुपयेपेट्रोल 17 पैसे, तर डिझेल 16 पैशांनी स्वस्तनवी दिल्ली : पेट्रोल प्रतिलिटर 77.56 रुपये, डिझेल प्रतिलिटर 72.31 रुपये

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 17 पैसे तर डिझेलचे दर 16 पैशांनी स्वस्त झाले आहेत. कपात करण्यात आलेल्या किंमतीनुसार मुंबईकरांना प्रतिलिटर पेट्रोलसाठी 83.07 रुपये तर प्रतिलिटर डिझेलसाठी 75.76 रुपये मोजावे लागणार आहेत. राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल 17 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे राजधानीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 77.56 रुपये, तर प्रतिलिटर डिझेलसाठी 72.31 रुपये मोजावे लागणार आहेत.

मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.

 

टॅग्स :पेट्रोलडिझेल