Join us

Today's Fuel Price : पेट्रोल 20 पैसे तर डिझेल 19 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 7:43 AM

Today's Fuel Price : मुंबईकरांना पाडव्याचं गिफ्ट, आजही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये झाली घट

मुंबई - इंधनाच्या दरांमध्ये आज पुन्हा घट झाली आहे. पेट्रोल 20 पैसे आणि डिझेल 19 पैशांनी स्वस्त झाले आहे. यानुसार मुंबईतपेट्रोलची प्रतिलिटर किंमत 83.72 रुपये तर डिझेल प्रतिलिटर  76.38 रुपये एवढे झाले आहे.  राजधानी नवी दिल्लीतही इंधनाच्या दरांमध्ये घट झाली आहे आहे.   

दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 21 पैशांनी कमी झालीय तर डिझेल 18 पैशांनी स्वस्त झाले आहे. यानुसार, दिल्लीकरांना प्रतिलिटर पेट्रोलसाठी 78.21 रुपये आणि डिझेलसाठी 72.89 रुपये मोजावे लागणार आहेत. बुधवारचा (7 नोव्हेंबर) दिवस वगळता गेल्या दोन आठवड्यांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं घट होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थोडासा का होईना पण दिलासा मिळत आहे. 

इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.

टॅग्स :पेट्रोलडिझेलमुंबई