मुंबई : होमिओपॅथी डॉक्टरांनी विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांमुळे त्यांना अडचणी येत आहेत. यावर सरकारने तोडगा काढावा, होमिओपॅथीच्या डॉक्टरांची परीक्षा लवकर घ्यावी या प्रमुख मागण्यांसाठी 3क् जुलै रोजी होमिओपॅथी डॉक्टर आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत.
होमिओपॅथी डॉक्टरांनी अॅलोपॅथीची औषधे देण्याची परवानगी नव्हती. मात्र यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची औषधे देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र 194क्-45च्या औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यामुळे मर्यादा आहेत. यावर सरकारने योग्य तो तोडगा काढावा यासाठी आठवडाभराची मुदत देण्यात आली होती. मात्र तरीही सरकारने कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्यामुळे आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र राज्य होमिओपॅथीक डॉक्टर्स कृती समिती सदस्य डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)