Join us

आजची घटना दुर्दैवी, चौकशीचे आदेश दिले आहेत - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

By admin | Published: January 02, 2015 1:51 PM

. उपनगरीय रेल्वेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नियोजित आराखडा तयार करु असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २ - मध्य रेल्वेवरील आजची घटना दुर्दैवी असून उपनगरीय सेवेकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. उपनगरीय रेल्वेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नियोजित आराखडा तयार करु असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहे. मध्य रेल्वेवरील घटनेविषयी रेल्वे महाव्यवस्थापकांना चौकशीचे आदेश दिले आहेत असे सुरेश प्रभूंनी म्हटले आहे. 
ठाकूर्लीजवळ पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी सकाळी विस्कळीत झाली. अखेर दिवा स्थानकातील प्रवाशांचा संयम सुटला व त्यांनी रेल रोको केले. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या दगडफेकीत मोटरमन जखमी झाला असून पोलिसांची जीपही जाळण्यात आली होती. यामुळे सुमारे सहा तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प पडली होती. या घटनेची रेल्वेमंत्री सुरेश मंत्री यांनी दखल घेतली आहे. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना मुंबईत येऊन मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत चर्चा करुन समस्यांवर तोडगा काढण्याचे निर्देश दिल्याचे प्रभूंनी सांगितले. मुंबईतील रेल्वेप्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशीसोबत चर्चा झाली असून राज्य व केंद्र सरकार एकत्र येऊन मुंबईकरांच्या समस्या दूर करण्याचे प्रयत्न करतील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.