प्रदेश काँग्रेसची आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 06:09 AM2019-05-30T06:09:41+5:302019-05-30T06:09:45+5:30

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रदेश काँग्रेसच्या संसदीय मंडळाची गुरुवारी बैठक होत असून या बैठकीत पराभवाची कारणमिमांसा आणि येत्या विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यात येणार आहे.

 Today's meeting of Pradesh Congress | प्रदेश काँग्रेसची आज बैठक

प्रदेश काँग्रेसची आज बैठक

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रदेश काँग्रेसच्या संसदीय मंडळाची गुरुवारी बैठक होत असून या बैठकीत पराभवाची कारणमिमांसा आणि येत्या विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शविली असून अशोक चव्हाण यांच्यासह अनेक प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे पक्षाध्यक्षांकडे पाठवले आहेत. चव्हाणांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. दुसरीकडे, राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विखे यांच्या जागी नव्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करावी लागेल. कारण १७ जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नये, असा ठरावही या बैठकीत संमत केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Web Title:  Today's meeting of Pradesh Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.