आज प्रवाशांचे मेगाहाल; मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:15 AM2017-10-08T03:15:54+5:302017-10-08T03:16:03+5:30
मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवार, ८ आॅक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येईल. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी तसेच वांद्रे/अंधेरी मार्गावर हा ब्लॉक असेल.
मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवार, ८ आॅक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येईल. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी तसेच वांद्रे/अंधेरी मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार असल्याचे चित्र आहे. परंतु पश्चिम मार्गावर ब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ४.२१ वाजेपर्यंत कल्याणहून सुटणा-या अप जलद मार्गावरील लोकल कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. तसेच ठाणे व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यानच्या लोकल अप जलद मार्गावर चालवण्यात येतील. हार्बर मार्गावर ब्लॉकदरम्यान पनवेल-कुर्ला विशेष लोकल चालविण्यात येतील. प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्याच तिकिटावर मध्य व पश्चिम मार्गावरून प्रवास करण्यास मुभा आहे.
एक्स्प्रेसला ‘लेट’मार्क
रविवारी गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंतच धावेल आणि ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर
गाडी दिवा स्थानकातून सुटेल. ब्लॉकदरम्यान मुंबईला येणाºया मेल/एक्स्प्रेस गाड्या २० ते ३०
मिनिटे उशिराने पोहोचतील.