Join us

दिशा फाउंडेशनचे आज अवयवदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 1:49 AM

दिशा फाउंडेशनच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी रक्तदान आणि अवयवदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : रक्तदान आणि अवयवदानाचे महत्त्व लक्षात घेता, दिशा फाउंडेशनच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी रक्तदान आणि अवयवदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर येथील महापालिका शाळा क्रमांक ३ येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्ण दिवस चालणाºया या उपक्रमाला लोकप्रतिनिधींसह बॉलीवूड तारकांची हजेरी लागणार आहे, अशी माहिती दिशा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश शेट्टी यांनी दिली. ‘लोकमत’ या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. मागील सात वर्षांपासून दिशा फाउंडेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी रक्तदानासह अवयवदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. दिशा फाउंडेशनच्या उपक्रमाला जे. जे. रक्तपेढी, राजावाडी रक्तपेढी, रोटोसोटो सेंटर, राज्य सरकारचे विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र, चेंबूर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी, आय बँक असोसिएशन आॅफ इंडिया यांनी सहकार्य दर्शविले आहे. दरम्यान, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे येथे एचआयव्हीसंबंधी जनजागृती केली जाणार असून, या उपक्रमाला तीनशे ते पाचशेहून अधिक नागरिक उपस्थिती दर्शवितील, असा दावा दिशा फाउंडेशनने केला आहे.