आज ‘पेट’ची परीक्षा

By admin | Published: May 6, 2017 04:07 AM2017-05-06T04:07:39+5:302017-05-06T04:07:39+5:30

मुंबई विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान, विधी आणि अभियांत्रिकी शाखेतील पीचएडी पूर्व प्रवेश परीक्षा म्हणजे पेट परीक्षा

Today's 'Pet' test | आज ‘पेट’ची परीक्षा

आज ‘पेट’ची परीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान, विधी आणि अभियांत्रिकी शाखेतील पीचएडी पूर्व प्रवेश परीक्षा म्हणजे पेट परीक्षा शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे. पण, शुक्रवारी दुपारपर्यंत काही परीक्षार्थी हॉल तिकीट न मिळाल्याने चिंतेत होते, पण सायंकाळपर्यंत परीक्षार्थींना हॉल तिकीट मिळाले.
पीएचडीसाठी अर्ज  करणाऱ्या परीक्षार्थींच्या संख्येत  यंदा वाढ झाली आहे. यंदा ‘पेट’ परीक्षेला एकूण ४ हजार ४६५ अर्ज आले होते. त्यापैकी ३ हजार २६७ परीक्षार्थींनी परीक्षेला नावनोंदणी केली आहे. यापैकी १ हजार १९४ परीक्षार्थींनी शुल्क भरलेले नाही,
तर ४ जणांचे अर्ज रद्द करण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठातर्फे देण्यात आली. यंदा १२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.

Web Title: Today's 'Pet' test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.