Join us  

आज ‘पेट’ची परीक्षा

By admin | Published: May 06, 2017 4:07 AM

मुंबई विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान, विधी आणि अभियांत्रिकी शाखेतील पीचएडी पूर्व प्रवेश परीक्षा म्हणजे पेट परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान, विधी आणि अभियांत्रिकी शाखेतील पीचएडी पूर्व प्रवेश परीक्षा म्हणजे पेट परीक्षा शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे. पण, शुक्रवारी दुपारपर्यंत काही परीक्षार्थी हॉल तिकीट न मिळाल्याने चिंतेत होते, पण सायंकाळपर्यंत परीक्षार्थींना हॉल तिकीट मिळाले. पीएचडीसाठी अर्ज  करणाऱ्या परीक्षार्थींच्या संख्येत  यंदा वाढ झाली आहे. यंदा ‘पेट’ परीक्षेला एकूण ४ हजार ४६५ अर्ज आले होते. त्यापैकी ३ हजार २६७ परीक्षार्थींनी परीक्षेला नावनोंदणी केली आहे. यापैकी १ हजार १९४ परीक्षार्थींनी शुल्क भरलेले नाही, तर ४ जणांचे अर्ज रद्द करण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठातर्फे देण्यात आली. यंदा १२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.