राज्यभरातील निवासी डॉक्टरांचे आज एकदिवसीय कामबंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 05:04 AM2019-06-14T05:04:10+5:302019-06-14T05:04:19+5:30

कोलकाता येथील निवासी डॉक्टर मारहाणीचा निषेध

Today's resident doctors across the state today organized a one-day workshop agitation | राज्यभरातील निवासी डॉक्टरांचे आज एकदिवसीय कामबंद आंदोलन

राज्यभरातील निवासी डॉक्टरांचे आज एकदिवसीय कामबंद आंदोलन

Next

मुंबई : कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना, असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र या संघटनांकडून १४ जून रोजी राज्यव्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग, अन्य विभाग आणि शैक्षणिक दिनक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यादरम्यान राज्यातील रुग्णालयांतील आपत्कालीन रुग्णसेवा सुरू असेल

कोलकात्यातील मारहाणीचा महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रलमार्ड आणि इंटर्न डॉक्टरांची संघटना अस्मी यांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी #२ं५ीङ्मिू३ङ्म१ अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच, डॉक्टरांना सतत होणाऱ्या मारहणीच्या निषेधात न्याय देण्यासाठी एकत्र उभे राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध पत्रक काढले आहे.
सरकार जागतिक स्तरावर आरोग्य योजना बनवण्यात व्यस्त आहेत. पण, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे. सरकार आम्ही कायदा हातात घेऊ याची वाटत पाहत आहे का, असा सवाल मार्डने उपस्थित केला. आमच्या सुरक्षेसाठी सरकारला वारंवार पत्र लिहून आणि विनंती करून थकलो आहोत. आता आमचा संयम संपलेला आहे. त्यामुळे आता कोणतीही पूर्वसूचना न देता कृती केली जाईल, असा इशारा मार्डच्या डॉक्टरांनी परिपत्रकात दिला. याशिवाय देशातील सर्व राज्यांच्या सरकारने राज्यातील रुग्णालयांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्रातल्या इंटर्न डॉक्टरांनी केली.

डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा
या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशपातळीवर सर्व डॉक्टर काळ्या फिती बांधून काम करणार आहेत. शिवाय संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये धरणे आंदोलन करून निषेध करण्याचे आवाहन आयएमएने दिले आहे. याखेरीज, इंडियन मेडिकल असोसिएशनने सातत्याने डॉक्टरांवर होणाºया हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित शासकीय विभागांना पत्र पाठविण्याचे आवाहनही असोसिएशनच्या वतीने केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयएमएने दिली आहे.

Web Title: Today's resident doctors across the state today organized a one-day workshop agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.