आजची तरुण पिढी हुशार, पण मेहनती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:11 AM2017-08-03T02:11:36+5:302017-08-03T02:11:36+5:30

आजची तरूण पिढी हुशार आहे, परंतु मेहनत करत नसल्यामुळे अनेक तरूण मागे राहत आहेत. विद्यार्थ्यांनी मेहनत केली तर यश नक्कीच मिळेल.

Today's younger generation is smart, but not hardworking | आजची तरुण पिढी हुशार, पण मेहनती नाही

आजची तरुण पिढी हुशार, पण मेहनती नाही

Next

मुंबई : आजची तरूण पिढी हुशार आहे, परंतु मेहनत करत नसल्यामुळे अनेक तरूण मागे राहत आहेत. विद्यार्थ्यांनी मेहनत केली तर यश नक्कीच मिळेल. यश मिळविण्यासाठी शिक्षण अत्यंत गरजेचे आहे. पण, शिक्षणासाठी फक्त पैसा गरजेचा नसून आपल्यात शिकण्याची जिद्द असायला हवी, असे प्रतिपादन डॉ. पवन अग्रवाल यांनी केले.
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुंबई व ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांच्या सत्कार सोहळ्याचेआयोजन करण्यात आले होते. यावेळी अग्रवाल बोलत होते. शनिवारी लोअर परळ येथील बाळ दंडवते स्मृती सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या मुलांना भविष्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार सुनील शिंदे, वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेते जास्त शिकलेले नसले तरी त्यांची पुढची पिढी उच्च शिक्षणाकडे वाटचाल करत आहे. प्राथमिक टप्पा असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त विजय रावराणे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.
बृन्हमुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने समृध्दी गावडे, लतिका विनेरकर व राधिका वाणी या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी कार्यकारिणी सदस्य अजित सहस्रबुद्धे, अशोक गोयेकर, हेमंत मोरे, प्रकाश गिलबिले, प्रशांत ब्रीद, श्रीकांत शिगवण, प्रकाश कानडे, विश्वनाथ राणे, प्रवीण देवधर, लालशेकर सिंग, सुनिल दुब तसेच लोअर परळ विभागाच्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार कार्याध्यक्ष संजय शांताराम चौकेकर, सरचिटणीस कृष्णकांत (बाळा) पवार व खजिनदार जीवन विठोबा भोसले यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व्यवस्थित सांभाळून हा सोहळा संपन्न केला.

Web Title: Today's younger generation is smart, but not hardworking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.