एकदरात टायफॉईडची साथ

By admin | Published: April 9, 2015 11:20 PM2015-04-09T23:20:39+5:302015-04-09T23:20:39+5:30

एकदरा ग्रा.पं. हद्दीतील लोकांना दूषित पाण्यामुळे टायफॉईड तापाची साथ बळावली आहे. या ग्रा.पं. मधील ८० टक्के लोकसंख्या तापाने आजारी पडलेली

Together with Typhoid | एकदरात टायफॉईडची साथ

एकदरात टायफॉईडची साथ

Next

नांदगाव : एकदरा ग्रा.पं. हद्दीतील लोकांना दूषित पाण्यामुळे टायफॉईड तापाची साथ बळावली आहे. या ग्रा.पं. मधील ८० टक्के लोकसंख्या तापाने आजारी पडलेली आहे. सर्व रुग्णांना ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी भरती केले असून सलाईनमधून इंजेक्शन्स देण्यात येत आहेत.
गेले तीन दिवस येथे तापाने थैमान घातले असून गावातील बहुतांश ग्रामस्थ तापाने आजारी आहेत. गटविकास अधिकारी संदीप जठार व तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी तातडीने परिसराची पाहणी करून आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. आगरदांडा येथील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी एकदरा येथे कॅम्प लावला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी सांगितले की, एकदरामध्ये आरोग्य कॅम्प लावण्यात आला आहे. रुग्णांना सलाईन, इंजेक्शन व गोळ्या दिल्या जात आहेत. दूषित पाण्याचे नमुने टेस्टिंगला पाठविले आहेत. शंभर लोकांचे ब्लड टेस्ट केले असता ३२ रुग्णांना टायफॉईड झालेला आढळून आले आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Together with Typhoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.