CSMT च्या टॉयलेट-बाथरूममधून १२ लाखांचे नळ अन् इतर वस्तू लंपास; रेल्वे अधिकारी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 09:55 AM2024-02-07T09:55:28+5:302024-02-07T09:56:11+5:30
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ( CSMT Station theft) रेल्वे स्थानकात एक विचित्र चोरी घडली.
मुंबई ( Mumbai News ) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ( CSMT Station theft) रेल्वे स्थानकात एक विचित्र चोरी घडली. CSMT रेल्वे स्थानकातील टॉयलेट आणि बाथरूममधील १२ लाखांचे नळ व इतर वस्तूंची चोरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी असलेल्या स्थानकानजीक नवीन वातानुकुतील टॉयलेट नुकतेच बनवण्यात आले होते आणि तेथून ही चोरी झाली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा त्यांनी जाऊन टॉयलेट-बाथरूमची पाहणी केली आणि ते सर्व हैराण झाले.
टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे आणि हे काम आतल्याच व्यक्तिचं असल्याचं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. जेट स्प्रे, टॉयलेट सीट कव्हर, टॅप, बॉटल होल्डर आणि स्टॉपकॉक्स समाविष्ट असलेल्या सुमारे ७० गोष्टीची चोरी करण्यात आली. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ''हे एका आतल्या व्यक्तीचे काम असल्याचे दिसते, कारण केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच या खोलीत प्रवेश असतो.'
५ आणि ६ फेब्रुवारी दरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 'या चोरीत कंत्राटी कामगारांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. टॉयलेटमध्ये CCTV लावण्यास बंदी असल्याने चोरांचा शोध घेणे अवघडच आहे,'असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक जेट स्प्रेची किंमत १६०० रुपये असून चोरलेल्या १२ वस्तूंची किंमत १९,२०० रुपये असल्याची माहिती आहे. याशिवाय २८,७१६ रुपये किमतीची ६ नाणीही गायब आहेत. विशेष बाब म्हणजे ४ जानेवारीलाच एसी टॉयलेट प्रवाशांसाठी खुले करण्यात आले