Join us  

जोगेश्वरीतील रहिवाशांसाठी फिरते शौचालय

By admin | Published: June 27, 2017 3:43 AM

जोगेश्वरी येथील कॅप्टन सावंत मार्गावरील वॉर्ड क्रमांक ६४ मधील रस्ता रुंदीकरणामुळे महापालिकेने शौचालय तोडले. तेथील

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जोगेश्वरी येथील कॅप्टन सावंत मार्गावरील वॉर्ड क्रमांक ६४ मधील रस्ता रुंदीकरणामुळे महापालिकेने शौचालय तोडले. तेथील २०० रहिवाशांसाठी सुलभ शौचालयाची तात्पुरती व्यवस्था न करता शौचालय तोडले गेले. महापालिकेने स्थानिकांना दिलेल्या माहितीनुसार, रहिवाशांसाठी दुसरे शौचालय बांधण्यात येणार आहे. पण ते बांधण्याच्या आधीच जुने शौचालय तोडले. त्यामुळे या काळात स्थानिक जोगेश्वरीच्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करत होते.प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर हे येथील परिसराची पाहणी करत असताना त्यांच्या निदर्शनास शौचालयाची बाब आली. तेव्हा साहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची व्यवस्था केली जावी, यासंबंधीची चर्चा केली. जेणेकरून दुसरे शौचालय त्वरित बांधण्यात येईल. रहिवाशांना शौचालय बांधून दिले जात नाही, तोपर्यंत तात्पुरते फिरत्या शौचालयाची व्यवस्था करून देण्यात आली आहे, असे दाभाडकर यांनी सांगितले. फिरत्या शौचालयामुळे स्थानिक नागरिकांचा तात्पुरता प्रश्न सुटलेला असून त्वरित सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.