टोल फ्री क्रमांक महावितरणने बदलला, 11 अंकी नवीन नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 11:19 AM2022-09-21T11:19:30+5:302022-09-21T11:20:00+5:30
महावितरणतर्फे खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारीसाठी मिसकॉल सेवा उपलब्ध असून या क्रमांकात बदल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील सुमारे दोन कोटी ऐंशी लाख ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या महावितरणचा एक टोल फ्री क्रमांक बदलण्यात आला असून, नवीन नंबर १८००-२१२-३४३५ असा असणार आहे. तर पूर्वीपासून सुरू असलेल्या १८००-२३३-३४३५, १९१२ व १९१२० या क्रमांकात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
महावितरणतर्फे खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारीसाठी मिसकॉल सेवा उपलब्ध असून या क्रमांकात बदल केला आहे.
ग्राहक नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ०२२- ५०८९७१०० या क्रमांकावर मिसकॉल देऊन तक्रार नोंदवू शकतात. ज्या ग्राहकांनी मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदवले नाहीत त्यांनी नोंदवावे.